ठाणे : एकाद्या चित्रपटात शोभावा तसा खंडणीचा प्रकार ठाण्यात घडलाय. मोठा क्रिकेटर बनण्यासाठी एका तरुणानं खंडणी मागितली.
हरेंद्र असं यातरुणाचं नाव असून पैशांसाठी त्यानं आपल्या मित्राच्या मदतीनं हा गुन्हा केलाय. हरेशचा मित्र हरवलेल्या मुलांचे पोस्टर्स लावायचा. हरेशला पैशाची गरज असल्याचं लक्षात आल्यावर त्यानं हरवलेल्या मुलांच्या अपहरणाचा खोटा बनाव रचला आणि त्यांच्या घरच्यांकडून खंडणी मागितली.
मात्र, त्यांचा हा फिल्मी प्लॅन पोलिसांनी हाणून पाडला. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं सापळा रचून या दोघांना अटक केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.