आजारी पडणंही आता 'महाग' ठरणार!

शासकीय रुग्णालयांतल्या रुग्ण सेवा सुविधांच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. रुग्णशुक्ल आणि तपासणीच्या काही सेवा दरांमध्ये दुप्पट तिप्पट आणि चौपटीने वाढ करण्यात आली आहे.

Updated: Dec 29, 2015, 10:40 AM IST
आजारी पडणंही आता 'महाग' ठरणार! title=

मुंबई  : शासकीय रुग्णालयांतल्या रुग्ण सेवा सुविधांच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. रुग्णशुक्ल आणि तपासणीच्या काही सेवा दरांमध्ये दुप्पट तिप्पट आणि चौपटीने वाढ करण्यात आली आहे.

१० वर्षानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पहिल्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. सरकारी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या सामान्य रुग्णांवर मोठा आर्थिक  बोजा पडणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ५२ पानी जीआर काढून ही दरवाढ केली आहे.

पाहा, कोणत्या तपासणीसाठी आता किती रुपये मोजावे लागतील...  

- केस पेपररसाठी ५ ऐवजी १० रुपये मोजावे लागणार

- वैद्याकीय प्रमापत्र, वयाचा दाखल्यासाठी ३० रुपयांऐवजी ५० रुपये मोजावे लागणार

- शासकीय रुग्णवाहिकेसाठी प्रति किमी ८ रुपयांऐवजी १५ रुपये मोजावे लागतील

- रक्त लघवी तपासणीत दुप्पट वाढ

- 'एक्स रे'साठी ३० ऐवजी ५० रुपये मोजावे लागतील

- मनोरुग्णांना मोफत मिळणाऱ्या आयक्यू टेस्टसाठी १०० रुपये मोजावे लागणार

- भूल देण्यासाठी १२० ऐवजी १००० रुपये मोजावे लागतील 

- सोनोग्राफीसाठी ५० ऐवजी १०० मोजावे लागणार आहेत..