धुळे : धुळे जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीला लागलेल्या भीषण आगीत बँकेचं प्रचंड नुकसान झालंय. सकाळी बँकेच्या तिस-या मजल्याला आग लागली. धुळ्यासह, अंमळनेर, पारोळा, मालेगाव इथून गाड्या मागवून, तब्बल चार तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. ही आग शॉर्ट सर्किटनं लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
आगीत कर्ज, तसंच बँक खातेधारक आणि अकाऊंट विभाग पूर्णपणे जाळून खाक झालाय. यात जीवितहानी झाली नसली तरी महत्त्वाची कागदपत्रं जाळून राख झाली आहेत. बँकेचा सर्व डाटा सुरुक्षित असल्याचा दावा बँक प्रशासनानं केलाय. सोमवारी बँकेच्या सर्व ९० शाखांमध्ये व्यवहार सुरळीत सुरु होती असा दावाही करण्यात आलाय.