नाशिक : शहरात एका सायली ब्युटी पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली, हे पार्लर शहरातील उच्चभ्रू नागरिकांचा परिसर असलेल्या शरणपूररोड भागात आहे.
येथे ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री करणाऱ्या ४ मुलींसह, २ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतीत सरकारवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
या पार्लरमध्ये ब्युटी पार्लरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सायली ब्युटी पार्लरवर मंगळवारी पोलिसांनी धाड टाकली होती.