अहमदनगर: अहमदनगरमधील कोपर्डी, भांबोरा, नांदगाव इथल्या महिला अत्याचाराची घटना ताजी असतानाच राहुरीमध्ये आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली.
विलास वरपे या नराधमानं बँकेत नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून पीडित तरुणीवर अत्याचार केले. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन विलास वरपे आणि अन्य दोन अज्ञात इसमांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम विलास वरपेला गजाआड केलं असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे.