मुंबई : मेडिकलच्या प्रवेशासाठी खासगी महाविद्यालयात कशा रितीने एजंट कार्यरत आहेत याचं स्टिंग ऑपरेशन झी मीडियाने दाखवल्यावर आता सरकारला जाग आली आहे.
राज्यातल्या शिक्षण सम्राटांना राज्य सरकारने दणका दिला आहे. वैद्यकीय शाखांच्या प्रवेशांसाठी राज्य सरकारने सामूहिक प्रवेश प्रक्रिया लागू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यापुढे डीम्ड विद्यापीठातील वैद्यकीय शाखेचे प्रवेश नीटच्या मार्कांवर होणार आहेत. 1800 जागांसाठी याआधी डीम्ड विद्यापीठ स्वतःच्या अधिकारात प्रवेश घेत होती. मात्र आता त्यांना स्वतःच्या अधिकारात प्रवेश देता येणार नाहीत. 85 टक्के जागा शासनाच्या नियमानुसार तर 15 टक्के जागा मॅनेजमेंट कोट्यातून होतील.