परभणी : आमदाराच्या मद्यधुंद ड्रायव्हरने फॉरच्युनर गाडी व्हिस्टा गाडीला धडक दिली, यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. व्हिस्टा गाडीत एका पोलिसाचं कुटुंब होतं.
दरम्यान पाथरी मतदार संघाचे आमदार मोहन फड यांना औरंगाबाद एअरपोर्टवर सोडून हा ड्रायव्हर परतत होता.मद्यधुंद ड्रायव्हरला गावकऱ्यांनी पकडून, चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही घटना माजलगाव ते तेलगाव रस्त्यावर नित्रुड गावाजवळ घडली, वेळीच उपचार झाल्याने जखमी थोडक्यात बचावले आहेत, पण गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.अपघातग्रस्त व्हिस्टा गाडीत पोलीस कर्मचाऱ्याचं कुटुंब होतं. गाडीतल सूर्यकांत चाटे आणि त्यांचे कुटुंबीय जखमी झाले आहेत. सूर्यकांत चाटे हे जालना पोलिसात नोकरीवर आहेत.