कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडलाय... सिनीअर केजीमध्ये शिकणा-या एका पाच वर्षांच्या चिमुरडीला चक्क शाळेतून काढण्यात आलं... तिनं असा काय गुन्हा केला, पाहा हा खास रिपोर्ट...
सांगवी परिसरातली ही रेनबो शाळा... आणि याच शाळेत हा संतापजनक प्रकार घडलाय... सिनीअर केजीमध्ये शिकणा-या एका 5 वर्षांच्या छोट्या मुलीनं वर्गात शी केली... त्याची भलतीच शिक्षा शाळेनं दिली. तिला चक्क शाळेतून काढण्यात आलं. एवढंच नव्हे तर जाब विचारण्यासाठी पालक गेले, तेव्हा शाळेनं भलताच हट्ट धरला. यापुढे मुलगी शाळेत शी करणार नाही, अशी लेखी हमी द्या, अशी अजब मागणी शाळेनं केल्याचा आरोप पालकांनी केलाय.
दुसरीकडं शाळा प्रशासनानं मात्र हे आरोप फेटाळून लावलेत… उलट पालकांवर वारंवार वाद घालत असल्याचा ठपका ठेवलाय.
आता यात नेमकं खरं काय हे कसं ठरवायचं..? पण शाळांच्या मनमानीपणाचा फटका विद्यार्थी-पालकांना कसा बसतो, याचं हे ढळढळीत उदाहरण आहे. अशा मुजोर शाळांवर कारवाई व्हायला नको काय..?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.