पुणे : किरकोळ वादातून तलवार हल्ला करणा-या भाजपच्या निलंबित अल्पसंख्याक अध्यक्ष हाफिज शेखला अखेर अटक करण्यात आलीय.
औरंगाबाद पोलिसांनी पुण्यातून त्याला जेरबंद केलंय. हल्ल्यानंतर हाफिज फरार होता. 18 जानेवारीला गाडी पार्किंगच्या वादातून हाफिज तलवार घेऊन संदीप डहाळेचा खुन करण्याचा प्रयत्न केला होता.
फरार झाल्यावर हाफिजकडचे पैसै संपल्यावर त्यांनं नातेवाईकाला फोन करून पैसे घैऊन पुण्याला बोलावलं होतं. याची माहिती मिळताच पोलिसांनी हाफिजला जेरबंद केलंय. दरम्यान भाजपनं हाफिजसा निलंबित केलंय.