ठाणे : यंदा होळीत ठाण्यामध्ये इमारतीच्या गच्चीवरून पाण्याचे फुगे आणि पिशव्या मारल्या गेल्या, तर ते सोसायटीच्या पदाधिका-यांना भारी पडू शकतं. तशी तक्रार आल्यास पदाधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.
होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी गच्चीला कुलुप ठोका किंवा तिथून फुग्यांचा मारा होणार नाही, याची काळजी घ्या, असं आवाहनही पोलिसांनी केले आहे.
तसंच रंग विक्रेत्यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या असून आरोग्यास हानिकारक रसायनयुक्त रंग आणि फुगे तसंच प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री थांबवण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.