खेडात घराडवर दरड कोसळी, धरणग्रस्तांवर संकट कायम

खेड तालुक्यातील नातूनगरमधील मोरेवाडीत एका घराडवर दरड कोसळी. डोंगराचा एक भाग घरावरच आला. यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे.

Updated: Jun 28, 2016, 11:36 AM IST
खेडात घराडवर दरड कोसळी, धरणग्रस्तांवर संकट कायम title=
संग्रहित

रत्नागिरी : खेड तालुक्यातील नातूनगरमधील मोरेवाडीत एका घराडवर दरड कोसळी. डोंगराचा एक भाग घरावरच आला. यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे.

कोकणात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दरडी कोसळण्याचा घटना घडत आहेत. खेड तालुक्यातील नातूनगरच्या मोरेवाडीमध्ये एका घराडवर सकाळी दरड कोसळी आहे. दरड कसळल्यामुळे मोठा आवाज झाला आणि घरातील सर्व मंडळी काय झालंय म्हणून बघण्यासाठी घराबाहेर पडली. डोंगराचा एक भाग घरावर कोसळ्याचे त्यांना दिसेल. या कोसळलेल्या दरडीमुळे घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नातूनगरमध्ये राहणाऱ्या या लाकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, डोंगरभागात हे केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नातूनगर धरणात यांच्या जमिनी गेल्या त्यामुळे सरकारने यांचे पुनर्वसन या ठिकाणी केले. मात्र गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना जीव मुठीत ठेवून या ठिकाणी राहावे लागत आहे.