केडीएमसी निवडणुकीत या दिग्गजांनी 'माती खाल्ली'!

कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसली. यामध्ये, मतदारांनी कुणाच्या पारड्यात विजयाचं दान टाकलंय... तर कुणाला धूळ चाखायला लावलीय, पाहुयात... 

Updated: Nov 2, 2015, 08:19 PM IST
केडीएमसी निवडणुकीत या दिग्गजांनी 'माती खाल्ली'! title=

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसली. यामध्ये, मतदारांनी कुणाच्या पारड्यात विजयाचं दान टाकलंय... तर कुणाला धूळ चाखायला लावलीय, पाहुयात... 

शिवसेनेच्या महापौर तोंडावर
कल्याण डोंबिवलीच्या मावळत्या महापौर कल्याणी पाटील यांना या चुरशीच्या निवडणुकीत तोंडावर पडावं लागलंय... त्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसलाय. पाटील यांना भाजपच्या सुमन निकम यांनी अवघ्या 50 मतांनी धूळ चारलीय. प्रभाग क्रमांक ९२, दुर्गामाता मंदिर या प्रभागातून त्यांनी निवडणूक लढवलीय. 

- शिवसेनेचे सभागृह नेते कैलास शिंदे यांनाही पराभवाची चव चाखावी लागलीय. प्रभाग क्रमांक १०७ पिसवली इथून भाजपचे मोरेश्वर भोईर यांनी बाजी मारलीय. 

- शिवसेनेचे माजी सभागृह नेते अरविंद मोरे हेदेखील पराभूत झालेत. प्रभाग क्रमांक ३७ ज्योतीबाग इथे भाजपचे सचिन खेमा विजयी झालेत.

- प्रभाग क्रमांक ६६ आयरेगाव इथे शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांना तोंडावर पडावं लागलंय.  

- प्रभाग क्रम ३२ सिद्धेश्वर आळा इथून उभ्या राहिलेल्या भाजपच्या माजी नगरसेविका शुभा पाध्ये यांनाही मतदारांनी नाकारलंय. 

- भाजपचे कल्याण शहर अध्यक्ष अर्जुन म्हात्रे हेदेखील पराभूत झालेत

- सेनेचे माजी स्थायी सभापती दीपक ब्रिद यांनादेखील मतदारांनी जागा दाखवलीय. 

पाहा संपूर्ण निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ९१ ते १२२ चा निकाल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.