कल्याण : निवडणूक प्रचारात शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार खडाजंगी उडालेली पाहिली. आता दोन्ही राजकीय पक्षांना पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु केलेत. शिवसेना खासदार, आमदार यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग झालास, असा आरोप शिवसेनेने केलाय.
कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणुकीत शिवेसना खासदार अरविंद सावंत आणि आमदार बाळा किन्हीकर प्रचार करत असल्याची तक्रार दाखल झाल्याने या दोघांनाही नोटीसा बजवण्यात आल्यात. त्यानंतर कल्याणमध्ये निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता विभागाने पाहाणी केली.
विभागाच्या पाहाणीत खासदार सावंत आणि आमदार किन्हीकर दोषी आढळलेत. त्यानंतर आचारसंहिता विभागानं या दोघांना नोटीस पाठविलेय. या दोघांना कल्याण-डोंबिवलीतील निवडणूक परिसर सोडण्यासही या दोघांना सागंण्यात आले आहे. जर परिसर सोडला नाही तर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. भाजपनं पत्रके वाटल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजप वाद उफाळण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.