कोल्हापुरात सराफ व्यवसायिकांवर इन्कम टॅक्सची धाड

शहरातील दहापेक्षा अधिक सराफ व्यवसायिकांवर इन्कम टॅक्स विभागानं धाडी टाकल्यात. सकाळी दहा वाजल्यापासुन ही कारवाई सुरु असल्यानं सराफ व्यवसायीकांचे धाबे दणाणले. 

Updated: Sep 21, 2016, 11:58 PM IST
कोल्हापुरात सराफ व्यवसायिकांवर इन्कम टॅक्सची धाड

कोल्हापूर : शहरातील दहापेक्षा अधिक सराफ व्यवसायिकांवर इन्कम टॅक्स विभागानं धाडी टाकल्यात. सकाळी दहा वाजल्यापासुन ही कारवाई सुरु असल्यानं सराफ व्यवसायीकांचे धाबे दणाणले. 

कोल्हापूर आयकर विभागानं ह्या धाडी टाकल्या असुन उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमविल्याचा आणि इन्कम टॅक्स चुकवल्यामुळं ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मिळतेय. गुजरी परिसरात सराफ व्यवसायिकांची अनेक दुकानं असून नेमकं कोणकोणत्या सराफांवर छापे टाकण्यात आलेत.

याबाबत अधिकृत मिहीती मिळाली नसली तरी बी.डी.के. ज्वेलर्ससह इतर नऊपेक्षा अधिक सराफांच्या दुकांनावर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकण्यात आल्या आहेत.