मुंबई : ऐन गणपतीच्या तोंडावर कोकण रेल्वेचा प्रचंड खोळंबा झाला होता. आता सर्व गाड्या वेळेनुसार धावत आहेत.
24 ऑगस्टला अपघात होऊन कोकण रेल्वेचे वाहतूक ठप्प पडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑगस्टला वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र, पुन्हा मालगाडी घसरल्यामुळे विस्कळीत झालेली कोकण रेल्वे ताळ्यावर येते न येते तोच सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालाय. त्यामुळे अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर अडकून पडल्या होत्या. त्यातच अनेक विशेष गाड्या सोडण्यात आल्याने वेळापत्रकावर परिणाम दिसून आला. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास धिमा झाला होता.
गणेशोत्सवासाठी घराकडे निघालेल्या कोकणवासियांचे अतोनात हाल झालेत. 8 दिवसानंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे धावत आहेत, असी माहिती कोकण रेल्वेच्या मुख्यजनसंपर्क अधिकारी वैशाली पतंग यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.