औरंगाबाद निवडणुकीत एमआयएम सर्वात मोठा पक्ष

औरंगाबाद महापालिका निवडणूकात 25 जागांवर जिंकलेला एमआयएम पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. 

Updated: Apr 29, 2015, 03:03 PM IST
औरंगाबाद निवडणुकीत एमआयएम सर्वात मोठा पक्ष title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणूकात 25 जागांवर जिंकलेला एमआयएम पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. 

औरंगाबाद महापालिका निवडणुकीमध्ये 28 जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मात्र असं असलं तरी एमआयएम पक्षानं शिवसेनेला मागं टाकलंय ते म्हणजे मतदानाच्या टक्केवारीत.  होय... मतदानाची टक्केवारी पाहता औरंगाबादेत एमआयएम सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर शिवसेनेला दुस-या क्रमांकावर तर भाजपला तिस-या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी थेट 10 टक्क्यांच्याही खाली फेकल्या गेलेत.

मतदानाची टक्केवारी...

- एमआयएमला 87411 मतं म्हणजेच 16.49 टक्के मतं मिळाली. 
- शिवसेनेला 76297 मतं म्हणजेच 14.84 टक्के मतं मिळाली. 
- भाजपला 68155 मतं म्हणजेच 12.86 टक्के मतं मिळाली. 
- काँग्रेसला 61182 मतं म्हणजेच 11.54 टक्के मतं, 
- राष्ट्रवादी काँग्रेसला 25252 मतं म्हणजेच 4.76 टक्के मतं 
- तर बसपला 14191 मतं म्हणजेच 2.67 टक्के मतं मिळालीयत. 

या प्रमुख पक्षांना मिळून एकूण 63.16 टक्के मतं मिळालीयत. तर यापेक्षा जास्त म्हणजे 36.84 टक्के मतं अपक्षांनी मिळवलीयत. म्हणजे या निवडणुकांत अपक्षही सर्वात मोठा पक्ष ठरलाय. एमआयएमच्या यशाबाबत बोलतांना मुस्लिम मतं एकत्र केल्यानं त्यांची टक्केवारी वाढली असं युतीचे नेते सांगतायत. शिवसेना भाजपची मतांची टक्केवारी पाहता एमआयएम खूप मागे असल्याचंही ते सांगतायत.

युतीच्या तुलनेत एमआयएम मागे आहे. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीसाठी निश्चितच ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे.

एमआयएमचा हा वाढता प्रभाव अनेक राजकीय पक्षांना धडकी भरवणारा आहे. त्यामुळं आगामी काळात एमआयएम आपले पंख पसरवण्यात यश मिळवणार की इतर पक्ष एमआयएमचे पंख कापणार यावरच एमआयएमचं पुढील भवितव्य अवलंबून असणारेय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.