रत्नागिरी : शिवसेना भाजपातील अखेरच्या मंत्रीपद वाटपावरूनही दोन्ही पक्षातील कुरबूर सुरुच राहणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेनेनं आणखी एका कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय.
भाजपाचं आत्ताचं नेतृत्व पूर्वीच्या नेतृत्वासारखं नाही, असं म्हणत शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी जागावाटपाच्या घोळात शिवसेनेकडून पहिला हल्ला केलाय. त्यामुळे भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेनेला दोन राज्यमंत्रीपदाबरोबर एक कॅबिनेट मंत्रीपद द्यावं तो आमचा हक्कच आहे, असं खासदार गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केलंय. दापोलीतील आसूद गाव पंतप्रदान ग्राम दत्तक योजने अंतर्गत गाव दत्तक घेण्याच्या सोहळ्यात ते दापोलीत बोलत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.