ठाणे : कळवा हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेला उपचार न मिळाल्यानं मनसेनं रुग्णालयात आज हंगामा केला. दरम्यान, या मुजोरी प्रकरणी हाऊस ऑफिसर सविता उप्पड यांचं निलंबन करण्यात आलंय.
मनसेनं रुग्णालयात धडक मारून डीनला घेराव घालत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कळवा हॉस्पिटल मुजोरी प्रकरणी हाऊस ऑफिसर सविता उप्पड यांचं निलंबन करण्यात आलंय. 'झी २४ तास'ने हे प्रकरणाला वाचा फोडली आणि लावून धरली त्यानंतर निलंबनाची ही कारवाई करण्यात आलीय. हॉस्पिटलच्या डीन सी. मैत्रा यांनी ही कारवाई केली.
वैद्यकीय तपासणीसाठी केवळ ८०० रूपये नव्हते, म्हणून कळवा पालिका रूग्णालयातून एका गर्भवती महिलेला हाकलून देण्यात आलं होतं. यामुळे ती महिला रस्त्यावरच बाळंत होऊन तिचं बाळ दगावलं. या घटनेला झी मीडियाने वाचा फोडली आणि एकच खळबळ माजली.. विधानसभेतही हा मुद्दा चर्चेला आला.
वैद्यकीय तपासण्यांसाठी केवळ ८०० रूपये नव्हते म्हणून कळव्याच्या महापालिकेच्या रूग्णालयाच्या कर्मचा-यांनी शारदा घोडे या गर्भवती महिलेला तिच्या पतीसह हाकलून दिलं होतं. ही महिला रस्त्यातच बाळंत झाली आणि तिचं बाळ जीवाला मुकलं. झी मीडियाने या प्रकऱणाला वाचा फोडली आणि मग एकच संतापाची लाट उसळली. या प्रकरणाचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले.
हॉस्पिटलच्या कर्मचा-यांची ही मुजोर आणि असंवेदनशील वागणूक पाहिल्यावर या घटनेविरोधात राजकीय पक्षांनी जोरदार आंदोलन केलं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी रूता आव्हाड यांनी या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसंच हे प्रकरण लावून धरल्याबद्दल झी २४ तासचे आभारही मानले
मनसेनंही या प्रकरणी रुग्णालयात हंगामा केला. डीनला घेराव घालत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर या उसळलेल्या या जनक्षोभानंतर हॉस्पिटलच्या डीन सी मैत्रा यांनी कारवाई केली. हॉस्पिटलच्या हाऊस ऑफिसर सविता उप्पड यांना निलंबित करण्यात आलं.
गर्भवती महिलेला पैशांसाठी हॉस्पिटलच्या बाहेर हाकलण्याचा प्रकार लांच्छनास्पदच आहे. या प्रकरणी केवळ हाऊस ऑफिसरला निलंबित करून मूळ प्रश्न मिटणार नाही. या रूग्णालयाबाबत वारंवार तक्रारी येतच असतात. रूग्णांशी वागताना हॉस्पिटल प्रशासन आणि कर्मचा-यांनी वर्तन सुधारण्याची आणि संवेदनशील वागणूक देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आता उमटत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.