कोल्हापूर : जिल्ह्यातील दुसरे राजेही भाजपवासी झाले आहेत. खासदार संभाजीराजेनंतर समरजित घाटगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील यावेळी उपस्थित होते. समरजित घाटगे कागलच्या शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष असून अनेक सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांसाठी पायघड्या घातल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांना त्यांच्याच मतदारसंघात शह देण्यासाठी भाजपने त्यांना आपल्या गोटात ओढले आहे.