कोल्हापूर विद्यापीठाच्या लेडीज हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील लेडिज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थीनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. सुप्रिया कृष्णा पाटील असं या विद्यार्थीनीचं नाव असून ती एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. 

Updated: Dec 29, 2014, 11:23 AM IST
कोल्हापूर विद्यापीठाच्या लेडीज हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या title=

कोल्हापूर: कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील लेडिज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थीनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. सुप्रिया कृष्णा पाटील असं या विद्यार्थीनीचं नाव असून ती एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. 

विद्यापीठातील हॉस्टेल नंबर ३ मधील ७५ क्रमांकाच्या खोलीत पंख्याला गळफास लावून तिनं आत्महत्या केली. पोलीस आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी खोलीचं दार तोडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. मृत विद्यार्थीनी सांगली जिल्ह्यातील रेळेगाव इथली आहे. 

पोलीस तपासात तिच्याकडे चिठ्ठी आढळून आली आहे. या प्रकरणी कोल्हापूरातील राजापूरी पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद झाली आहे. शिवाजी विद्यापीठातील लेडिज हॉस्टेलमध्ये विद्यार्थीनीनं आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.