मुंबईचे एंट्री पॉइंट, एक्सप्रेस हायवेवर टोलमाफी देणं अवघड - मुख्यमंत्री

मुंबईचे एंट्री पॉइंट आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टोलमाफी देणं अवघड असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलीये. काल पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी ही कबुली दिलीय.  

Updated: Apr 22, 2015, 03:46 PM IST
मुंबईचे एंट्री पॉइंट, एक्सप्रेस हायवेवर टोलमाफी देणं अवघड - मुख्यमंत्री title=

पुणे: मुंबईचे एंट्री पॉइंट आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टोलमाफी देणं अवघड असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलीये. काल पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी ही कबुली दिलीय.  

राज्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीनं करारनामे केल्यामुळंच टोलमाफीच्या निर्णयात अडथळा येत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुंबई आणि पुण्यातल्या टोलचे करार युतीच्या काळात झालेले असल्यामुळं मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कुणावर होता याबाबत आता जोरदार चर्चा रंगली आहे. 

विधीमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्यातल्या 65 टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफीची घोषणा सरकारनं केली होती. त्यावेळी एक्सप्रेस हायवे आणि मुंबईच्या एन्ट्री पॉईंटबाबत समितीचा अहवाल आल्यानंतर 31 जूलैपर्यंत निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केलं होतं.

मात्र आता स्वतः फडणवीसच हे अवघड असल्याचं सांगत असतील, तर समिती म्हणजे केवळ फार्स आहे का, असा सवाल उपस्थित होतोय... तर कोल्हापूरकरांचीही टोलमुक्ती होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.