नवी मुंबई : नवी मुंबईतील पनवेलजवळच्या कामोठ्यात दरोडेखोरांनी ज्वेलर्सच्या दुकानावर घातलेला दरोडा सीसीटीव्हीत कैद झालाय. मंगळवारी संध्याकाळी कामोठ्यातल्या कलश ज्वेलर्सवर तीन दरोडेखोरांनी दुकानाच्या मालकावर चाकू हल्ला करत दरोडा घातला.
भरदिवसाचा दुकानावर दरोडा टाकल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन दरोडेखोर दुकानात घुसले. त्यांनी दुकानातील कर्मचारी आणि दुकान मालकाला धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार केला. यावेळी एकाने चाकूचा धाक दाखवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झालीत.
दरम्यान, याचवेळी दुकानतल्या कर्मचा-यानं दुकानाच्या बाहेर जाऊन आरडाओरडा केला. त्यामुळं या दरोडेखोरांचा मोठ्या दरोड्याचा प्रयत्न फसला. मात्र हाती आलेला २० हजारांचा ऐवज त्यांनी लांबवला. यातल्या दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केलंय. तर एक जण फरार झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.