धुळे : राज्यात १२ वे खुले जेल धुळ्यात उभारले जाणार आहे. धुळे जिल्हा कारागृहाकडे खुले जागा मुबलक प्रमाणात आहे. खुल्या जेलसाठी तशी पाहणी वरिष्ठ स्तरावरून करण्यात आली आहे.
पैठणच्या धर्तीवर हे खुले कारागृह उभारले जाणार असून येथे ज्या बंदीवानांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे आणि त्यांचा वर्तन चांगलं आहे, अशा बंदीवानांना येथे ठेवण्यात येणार आहे.
पुणे येथील कारागृहाचे विशेष पोलीस निरीक्षक सी एच वाकडे यांनी धुळ्यात येऊन जागेची पाहणी केली आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावरही पाठविण्यात आला आहे.