दारुड्या पतीच्या छळाला कंटाळून पत्नीनंच काढला काटा!

 दारू पिऊन पत्नीचा छळ करणाऱ्या इसमाचा त्याच्याच पत्नीनं गळा दाबून खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघकीस आलीय. 

Updated: Feb 26, 2015, 08:54 PM IST
दारुड्या पतीच्या छळाला कंटाळून पत्नीनंच काढला काटा! title=

पुणे :  दारू पिऊन पत्नीचा छळ करणाऱ्या इसमाचा त्याच्याच पत्नीनं गळा दाबून खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघकीस आलीय. 

गुरुवारी रात्री अडीच वाजल्याच्या सुमारास ही घटना पिंपळे-गुरगाव या भागात घडली. ४५ वर्षीय दत्तात्रय नारायण माने असं संबंधित इसमाचं नाव आहे. पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली दत्तात्रयची पत्नी प्राची हिला अटक केलीय. 

४० वर्षीय प्राचीनंही आपणच आपल्या पतीचा खून केल्याची कबुली दिलीय. दत्तात्रय आणि प्राची यांच्या लग्नाला २५ वर्ष झालीत. पण, दोन वर्षांपासून दत्तात्रय दारू पिऊन पत्नीला जास्त त्रास देत होता. दारू पिण्यासाठी पैसे देण्याकरिता तिचा छळ करत होता. या छळाला कंटाळून अखेर प्राचीनंच परकरची नाडी दत्तात्रयच्या गळ्याला आवळून त्याचा खून केला... असं प्राथमिक तपासात समोर आलंय. 

दत्तात्रयच्या खुनामागे आणखी काही कारण आहे का? याचा तपास सांगवी पोलीस घेत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.