रत्नागिरी : कच्च्या तेलाचे दर कोसळले याचा अब्जावधीचा फायदा केंद्र सरकारला झाला. मात्र हा सर्व फायदा खासगी कंपन्यांकडे जात असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
यावर्षीच्या ताळेबंदमध्ये रिलायन्स कंपनीचा ३७ टक्यांनी नफा वाढल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कच्च्या तेलाचा दर कोसळला मात्र विक्रीचा दर सरकारनं कमी केला नाही असं सांगत, पृथ्वीराज चव्हाणांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते.