पुणे : मोठ्या मोठ्या पक्षांना आपल्या ताकदीच्या जोरावर जे जमणार नाही, ते 93 वर्षांच्या एका आजीबाईंनी करून दाखवलंय...
एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ही अशक्य गोष्ट शक्य झालीय. पुण्यातील खेड तालुक्यातील ढोरे भांबुरवाडी गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गंगुबाई भांबुरे या 93 वर्षीय आजींनी आपलं नशीब आजमावलं.
महत्त्वाचं म्हणजे, गावातील मतदारांनीही या तरुण-तुर्क उत्साही आजीबाईंवर विश्वास दाखवला... आणि त्यांनी या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर अगदी सहजपणे मात केली.
भांबुरवाडी ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत. यापैंकी एका वॉर्डात गंगुबाईंना उमेदवारी मिळाली होती. वयाच्या या टप्प्यावर येऊन लोकशाही मार्गानं निवडणुकीत उभं राहून गावच्या विकासाची स्वप्न पाहणाऱ्या या आजीबाईंचं परिसरात कौतुक होतंय... आता या आजीबाई आपल्या गावचा विकास कसा घडवून आणतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.