सांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फड जागावाटपानंतर आणखी रंगणार आहे असं दिसतंय, कारण ज्या मतदार संघातील उमेदवारी निश्चित आहे, अशा मतदार संघात निवडणुकीच्या प्रचाराला उधाण आल्याचं दिसतंय. याचे रंग आता सोशल नेटवर्किंगवरही दिसू लागले आहेत.
राज्याचे गृहमंत्री आणि तासगावचे आमदार आर.आर.पाटील यांचं आणि भाजपचे खासदार संजय काका पाटील यांचं राजकीय वैर आता अख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे.
आर.आर.पाटलांसमोर काहीही करून अडचणी उभ्या करायच्या अशा प्रयत्नात विरोधक आहेत. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आर.आर.पाटलांसमोर ही आव्हानं उभी असतात, पूर्वी स्वकियांकडून ही आव्हानं होती, आता लोकसभेत भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांकडूनही आर.आर.पाटलांना आव्हानं दिली जात आहेत.
आर.आर.पाटलांनी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यात त्यांनी विरोधकांना कोपरखळ्या लगावल्या आहेत.
यात व्हिडीओत आर आर पाटीलं असं म्हणतात, "ही माहिती समोर आली आहे, देशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण पक्ष बदलून भारतीय जनता पार्टीत सामिल झाले. आणि खासदार झाले, त्यातील अनेक जण दोन-दोनदा विधानसभेला पराभूत झालेले होते. पण ते निवडून आले, कारण देशात मोदी लाट होती. मोदींमुळे आपण निवडणून आलो, असं न मानता मोदीचं आपल्यामुळे निवडून आले, असा काही जणांचा भ्रम आहे.
हा टोला भाजप खासदार संजयकाका पाटील यांना लगावल्याची चर्चा आहे. आर.आर.पाटलांनी हा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेजवर अपलोड केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.