नाराजांवर राज ठाकरे अधिक आक्रमक, नाशिकच्या दौ-याकडे लक्ष

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नाराजांचा पुढचा पेपर सोडवायचाय तो नाशिकमध्ये. राज ठाकरे उद्या नाशिकच्या दौ-यावर जातायत. आता येत्या शनिवारी राज ठाकरे मुंबईच्या नगरसेवकांना घेऊन नाशिकच्या दौ-यावर जाणार आहेत. नाशिकच्या विकासकामांचा हा आढावा दौरा असणार आहे. अर्थात तिथेही नाराजांची फौज तयार आहेच. पण राज ठाकरेंनी सध्या तरी नाराजांबद्दल गेले तर जाऊ देत, असंच धोरण स्वीकारलंय़.

Updated: Dec 12, 2014, 11:57 AM IST
नाराजांवर राज ठाकरे अधिक आक्रमक,  नाशिकच्या दौ-याकडे लक्ष title=

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नाराजांचा पुढचा पेपर सोडवायचाय तो नाशिकमध्ये. राज ठाकरे उद्या नाशिकच्या दौ-यावर जातायत. ;आता येत्या शनिवारी राज ठाकरे मुंबईच्या नगरसेवकांना घेऊन नाशिकच्या दौ-यावर जाणार आहेत. नाशिकच्या विकासकामांचा हा आढावा दौरा असणार आहे. अर्थात तिथेही नाराजांची फौज तयार आहेच. पण राज ठाकरेंनी सध्या तरी नाराजांबद्दल गेले तर जाऊ देत, असंच धोरण स्वीकारलंय़.

नाशिकचा बालेकिल्ला राखणं राज ठाकरेंसाठी आता सोपं राहिलेलं नाही. त्या बालेकिल्याचा एकेक बुरुज खिळखिळा होत चाललाय. त्याचा पुढचा अंक म्हणजे सचिन ठाकरेंचा भाजप प्रवेश. सचिन ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा दावा केला. याला महिनाही पुरा होत नाही तोच सचिन ठाकरेंनी मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपचा झेंडा हाती घेतलाय. इतकंच नाही तर पुढच्या महिन्यात देवळाली कँम्प छावणी परिषदेची निवडणूकही ते भाजपच्या तिकीटावर लढवतायत.

दुसरीकडे सचिन ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांच्या भाजप प्रवेशानं भाजपमध्ये धुसफूस सुरु झालीय.ठाकरेंच्या भाजप प्रवेशानंतर मनसेला मोठं खिंडार पडणार हे नक्की. सचिन ठाकरे आणि वसंत गीते या दोघांनीही एकाच वेळी राजीनामा दिला होता. त्यामुळे वसंत गीतेंचं पुढचं पाऊल काय असणार. याबद्दल चर्चा सुरू झालीय. त्याहीपेक्षा राज ठाकरे नाशिक दौ-यात या नाशिकच्या शिलेदारांना काय इंजेक्शन देणार याची उत्सुकता जास्त आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.