प्रेमसुख कटारीयांवर सलग 18 वर्ष बलात्कार केल्याचा गुन्हा

पुणे जिल्ह्याच्या राजकारणातले महत्त्वाचे नेते दौंडचे नगराध्यक्ष प्रेमसुख कटारीया यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. १८ वर्षे त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. 

Updated: Aug 2, 2014, 06:22 PM IST
प्रेमसुख कटारीयांवर सलग 18 वर्ष बलात्कार केल्याचा गुन्हा  title=

दौंड, पुणे: पुणे जिल्ह्याच्या राजकारणातले महत्त्वाचे नेते दौंडचे नगराध्यक्ष प्रेमसुख कटारीया यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. १८ वर्षे त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. 

विशेष म्हणजे या महिलेशी कटारीया यांचे संबंध होते. कटारिया यांच्यापासून तिला दोन मुलंही झाल्याचं या महिलेनं तक्रारीत म्हटलंय. मात्र आता कटारिया आपल्याला जिवे मारण्याची धमकी देत असल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलंय. 

पोलिसांनी या महिलेची मदत घेणं टाळलं. मात्र अनेक संघटनांच्या पाठिंब्यावर या महिलेनं दौंड पोलीस ठाण्यासमोर धरणं आंदोलन सुरू केलं. अखेर पोलिसांनी गुरूवारी रात्री उशीरा कटारिया यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

कोण आहेत प्रेमसुख कटारिया? 

  • दौंडचे नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया

  • सलग ४१ वर्षे दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक 

  • सहाव्यांदा दौंडचे नगराध्यक्ष 

  • दौंड अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष 

  • भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव 

  • पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.