रत्नागिरीत : कोकणातील गुहागर समुद्र किना-यावर शाम कदंब हा दुर्मिळ प्रजातीचा पक्षी आढळलाय. वजनदार बांधा, लांब व जाड मान, मोठं डोकं व चोच असलेला हा पक्षी युरोपमधून आल्याचं पक्षी अभ्यासकांचं म्हणणं आहे.
कदंब पक्षी आकारानं मोठा असून साधारण ७४ ते ९१ सें. मी. लांबीचा आहे. पक्ष्याचं वजन ३.३ किलो असल्याची माहिती आहे. युरोप, मंगोलिया या देशात ही पक्षी आढळतो. ग्रेलॅग असं इंग्रजी नाव शाम कदंब पक्षाचं आहे. स्थंलातर करताना थव्यातून भरटकल्यामुळे गुहागर समुद्र किनाऱ्यावर आला असावा असा अंदाज पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केलाय.