अकोला : महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात जुन्या 500 आणि 1000 नोटांची 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या काळ्या पैशांवरच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येताना दिसतोय. त्यामुळे, हा काळा पैसा कधी गंगेच्या पाण्यावर तरंगताना दिसतोय... तर कधी मंदिरातील हुंड्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात जमा झालेला...
महाराष्ट्रातील अकोल्यात एका व्यक्तीला 9 लाखांच्या नोटांसह अटक करण्यात आलीय. या सर्व नोटा 500 आणि 1000 रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा आहेत.
हा इसम ही रोकड कुठे घेऊन जात होता.... त्यानं ही रोकड कुठून आणली होती? याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. पोलीस यासंबंधी चौकशी करत आहेत.
Rs 9 lakh (500 and 1000 notes) recovered from a person in Maharashtra's Akola, one arrested.
— ANI (@ANI_news) November 13, 2016
दरम्यान, छत्तीसगडमध्येही 46 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केलीय. यातही 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांचा समावेश आहे.