सांगलीमध्ये हरणांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

सांगलीमध्ये हरणांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीय. त्याशिवाय या तस्करांकडून इतर प्राण्यांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त होतोय. 

Updated: Jun 11, 2015, 11:12 PM IST
सांगलीमध्ये हरणांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगलीमध्ये हरणांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीय. त्याशिवाय या तस्करांकडून इतर प्राण्यांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त होतोय. 

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं तस्करी करुन विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या हरणांची सुटका केलीय. यासंदर्भात पोलिसांनी दोन तस्करांना अटक केलीय. पोलिसांनी इस्लामपूर पेठ परिसरात सापळा रचला आणि फिरोज कुडपकर आणि संजय धुमाळ या दोघा तस्करांना बुलेरो गाडीतून हरणांची पिल्ल घेऊन जाताना अटक केली. रायगड जिल्ह्यातल्या महाडमधून हरणांची तस्करी केली होती. 

हरणांच्या पिल्लांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलंय. या पिल्लांची किंमत दहा लाख रुपये आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये कासव आणि वाघ नखांचे फोटो आढळून आलेत. त्यामुळे अन्य प्राण्याचीही हे आरोपी तस्करी करत असतील असा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी हरणांचे प्राण वाचवून आरोपींना अटक केलीय खरी. मात्र आत्ता ढिम्म वन विभागानं आता तरी कडक पावलं उचलावीत एवढीच अपेक्षा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.