जळगाव : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे लालदिवा नसलेल्या गाडीतून मुक्ताईनगर येथे आगमन झालंय. सकाळी भुसावळ स्टेशन पासूनही सरकारी गाडीत बसणं खडसेंनी टाळलंय.
सरकारी गाडीत न बसन्यामागे कारण काय असा प्रश्न? आता विचारला जातोय. दरम्यान सरकारी गाड्यांचा ताफा मात्र त्यांच्या सोबतच कायम होता. आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीला खडसे अनुपस्थित आहेत. काल रात्रीच खडसें मुक्ताईनगरला रवाना झाले आहेत.
भोसरी एमआयडीसीत पत्नीच्या नावे केलेली जमीन खरेदी खडसेंच्या चांगलीच अंगाशी येतेयं. काल दिवसभर त्यांनी मुख्यमंत्री आणि पक्षातल्या नेत्यांशी खडसेंची चर्चा सुरू होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचीही बैठक झाली. त्यानंतर येत्या मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंचे पंख कापण्याची तयारी सुरू झाल्याचं बोललं जातंय.
याच पार्श्वभूमीवर खडसे नाराज असल्याचं बोललं जातयं. दरम्यान नाराजी नसल्याचं समजावण्यासाठी जळगावातला पूर्वनियोजित कार्यक्रमांची यादीही सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहेत.