इंदापूर : कुशल नेतृत्त्व आणि मुत्सद्दी राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवारांचा आणखी एक नवा पैलू समोर आलाय.
राजकीय आयुष्यात कितीही व्यस्त असले तरी वैयक्तीक पातळीवर हितसंबंध जोपसण्यात पवार तेवढेच माहीर आहेत... आणि त्याचाच प्रत्यय इंदापूरमध्ये आला.
इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकीतल्या एका जुन्या मित्रानं पवारांना जेवणासाठी घरी बोलावलं... आता शरद पवार म्हटल्यावर ते येतील की नाही? असा स्वाभाविक प्रश्न केवळ जगन्नाथ मोरेंच्याच नव्हे तर गावातल्या प्रत्येकाच्या मनात आला.
मात्र, राजकारणाच्या पलिकडे संबंध जपणाऱ्या पवारांनी मोरेंच्या घऱी जाऊन त्यांच्या कुटुंबियांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. एवढंच नव्हे तर गावातल्या लोकांशीही त्यांनी संवाद साधत जुन्या आठवणी जागवल्या.