मुंबई : एकीकडं देश सोडून जाण्याची भाषा किरण राव आणि आमिर खान करतायत... तर दुसरीकडं देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या शहीद कर्नल संतोष महाडिकांच्या पत्नीला मात्र आपली मुलं देशसेवेसाठी अर्पण करायचीयत...
आता बेताल बडबड करणारा आमिर खान हा खरा हिरो? की वीरपत्नी स्वाती महाडिक खरी हिरो? आमिर खान खरंच घाबरलाय की, नुसतीच भीती पसरवतोय? आणि देशात खरंच असहिष्णूतेची 'दंगल' उसळलीय की, नुसताच धूर पसरलाय?
सिने अभिनेता आमिर खानच्या देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावरून देशभरात एकच हलकल्लोळ माजलाय.... आमिर समर्थक विरूद्ध आमिर विरोधक एकमेकांसमोर दंड थोपटून उभे ठाकलेत.
ज्या देशानं आमिर खानला 'राजा हिंदुस्तानी' बनवलं, तोच भारत देश सोडून जावं, असं त्याला आणि त्याची बायको किरण रावला का वाटतंय? 'अतुल्य भारत' मोहीमेचा ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून मिरवणा-या आमिरला आणि त्याच्या बायकोला या देशात राहण्याची भीती का वाटतेय? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात सक्रीय सहभाग घेणा-या आमिरला कसली चिंता वाटतेय?
आमिरच्या याच वक्तव्यावरून आता हलकल्लोळ माजलाय... बॉलिवूडच नव्हे तर सोशल मीडियात आणि राजकीय वतुर्ळातही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होतायत...
मुस्लिमांसाठी भारताएवढा सुरक्षित देश नाही, अशा शब्दांत भाजपनं आमिरचा समाचार घेतलाय.
राहुल गांधींचे आमिरला समर्थन
सरकारला प्रश्न विचारणा-या सर्वांना देशद्रोही ठरवण्यापेक्षा सरकारनं त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. धाकदपटशा किंवा धमक्या देऊन प्रश्न सुटत नाहीत... अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आमिरची बाजू घेतलीय.
का वाटतं आमिरला असुरक्षित
गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरीत झालेली मुस्लिमाची हत्या, पाकिस्तानी कलावंताना विरोध, विचारवंत-साहित्यिकांच्या झालेल्या हत्या, आणि त्याच्या निषेधार्थ साहित्यिक-कलावंतांची पुरस्कार वापसी अशा घटनांवरून सध्या देशात असहिष्णूतेचा वाद पेटवला जातोय. त्यात भाजप नेत्यांची आक्रस्ताळी विधानं...
मुसलमानांनी पाकमध्ये जावं...
ज्या मुसलमानांना देशात असहिष्णू वातावरण आहे, असं वाटतं ते पाकिस्तानात जायला मोकळे आहेत, अशी वक्तव्यं राज्यपालपदावर बसलेल्या पद्मनाभ आचार्य यांच्यासारख्या व्यक्ती करतायत...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.