नागपूर : सगळं सोडेन पण पुन्हा भाजपचा अध्यक्ष होणार नाही हे पक्षाला निक्षून सांगितलं असल्याचं वक्तव्य केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केलं आहे.
तसंच पूर्ती कंपनीबाबत माझ्यावर झालेले सगळे आरोप हे षडयंत्र होतं. नंतर अनेक नेत्यांनी माफी मागितली, असंही गडकरी म्हणाले आहेत. कंपनीसंबंधी झालेल्या कारवाईनं मी व्यथित झाल्याची खंतही गडकरींनी बोलून दाखवली.
नागपूरमधल्या सप्तक संस्थेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली गेली. या मुलाखतीमध्ये गडकरींनी हे वक्तव्य केलं आहे.