शनी शिंगणपूर : गेले काही दिवस शनी शिंगणापूरच्या शनी मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून चालेला वाद शमण्याची काही चिन्ह दिसत नाहीत.
भूमाता ब्रिगेड नावाच्या स्त्रीहक्क संघटनेने आता आज म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला ६०० महिला कार्यकर्त्यांसोबत मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शनीशिंगणपूरमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे.
मंदीर परिसरात जमावबंदी करण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे.
या संघटनेने प्रवेशासाठी एक हेलिकॉप्टरही बुक केल्याची माहिती आहे. वेळ पडल्यास या हेलिकॉप्टरने मंदिरात घुसू असा इशारा या महिलांनी दिलाय. दरम्यान पोलिसांनी मंदिर परिसरात हेलिकॉप्टरच्या उड्डाणावरही बंदी घातली आहे.
तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र आपण मानवी साखळ्या बनवून महिलांना शनी चौथऱ्यावर जाण्यापासून रोखू, असे म्हटले आहे.