डोंबिवलीत भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

डोंबिवलीमध्ये भरदिवसा एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. डोंबिवली पुर्वेतील गोग्रासवाडी जिमखाना रोडवरील साऊथ इंडियन कॉलेज समोर आज भरदिवसा एका विद्यार्थ्याची भर रस्त्यात चाकूने भोसकून हत्या करण्यात आलीये. 

Updated: Jan 24, 2017, 04:07 PM IST
डोंबिवलीत भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये भरदिवसा एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. डोंबिवली पुर्वेतील गोग्रासवाडी जिमखाना रोडवरील साऊथ इंडियन कॉलेज समोर आज भरदिवसा एका विद्यार्थ्याची भर रस्त्यात चाकूने भोसकून हत्या करण्यात आलीये. 

प्रणव मोरे असं त्या विद्यार्थ्याचे नाव असू, तो त्याच कॉलेज मध्ये एफवायबीकॉम चा विद्यर्थी असल्याचे कळतंय. प्रणव मोरेला आज दोन तरुणांनी कॉलेज बाहेर बोलावून घेतले. १२ च्या सुमारास त्याची धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली. हत्या करणारे दोन तरुण देखील त्याच भागातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, हत्या करुन हे दोघं फरार झाल्याचे.

हत्येचे कारण तसे स्पष्ट होवू शकले नाही पण मुलीच्या मैत्रीवरुन प्रणव आणि त्या दोन मुलांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले त्यात दोन तरुणांनी फिल्मी स्टाईलने प्रणयची हत्या केल्याचे समोर येतय.