'टॉनिक'चे संपादक मानकरकाका यांचे निधन

जेष्ठ चित्रकार आणि ‘टॉनिक’ या मुलांच्या दिवाळी अंकाचे संपादक मानकरकाका उर्फ कृष्णा मानकर यांचं शनिवारी ह्रदयविकाराच्या आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कथा, मुलगा चित्रभूषण, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. 

Updated: Nov 29, 2015, 08:33 AM IST
'टॉनिक'चे संपादक मानकरकाका यांचे निधन title=

मुंबई : जेष्ठ चित्रकार आणि ‘टॉनिक’ या मुलांच्या दिवाळी अंकाचे संपादक मानकरकाका उर्फ कृष्णा मानकर यांचं शनिवारी ह्रदयविकाराच्या आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कथा, मुलगा चित्रभूषण, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. 

कौटुंबिक कामासाठी मानकरकाका विठ्ठलवाडी इथं गेले होते. तिथूनच ते विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या विवेकानंद व्याख्यानमालेस जाण्यासाठी निघाले असता त्यांना ट्रेनमध्ये अस्वस्थ वाटू लागले. प्रवाशांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले. 

मानकरकाका यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता. या प्रभावातूनच त्यांनी मुलांवर संस्कार व्हावेत या दृष्टीकोनातून ‘टॉनिक’ या दिवाळी अंकाची १९७९मध्ये निर्मिती केली. गेली ३६ वर्षे अथकपणे ‘टॉनिक’ या दिवाळी अंकाचे ते नियमित प्रकाशन करत होते. ‘टॉनिक’ला गेल्या ३६ वर्षात ५६ पुरस्कार मिळाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.