www.24taas.com, मुंबई
आदर्श प्रकरणी आज सीबीआयला जोरदार झटका बसलाय. या घोटाळ्यातील ७ आरोपींना आज मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. सीबीआयनं ६० दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्यानं हा जामीन मंजूर केल्याचंही यावेळी हायकोर्टानं म्हटलंय. त्यामुळे हे सीबीआयचं एक मोठं अपयशच मानलं जातंय.
आदर्श घोटाळ्याप्रकरणी कन्हैयालाल गिडवानी, प्रदीप व्यास, एम. एम. वांच्छू, टी. के. कौल, ए. आर. कुमार, आर. सी. ठाकूर, पी. व्ही. देशमुख या सात जणांना जामीन मिळाला आहे. ५ लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका झालीय. मात्र, त्यांचे पासपोर्ट जप्त केले जाणार आहेत तसंच आठवड्यातून दोन दिवस या सातही जणांना हजेरी लावावी लावण्याचे आदेश यावेळी न्यायायानं दिले आहेत.