कृपांकडे बेकायदा ४०० काडतूस

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी याआधीच अडचणीत सापडलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कृपांविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Updated: Apr 14, 2012, 04:23 PM IST

www.24taas.com, मुंबई

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी याआधीच अडचणीत सापडलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कृपांविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वांद्रयातल्या साईप्रसाद इमारतीत घेतलेल्या झडती दरम्यान कृपांच्या घरात बंदुकीची ४००काडतुसं सापडली होती. प्रत्यक्षात शंभर काडतुसं बाळगण्याचा कृपांना परवाना होता. मात्र, परवानगीपेक्षा अधिक काडतूसे बाळगल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस अटक करणार की ते अटक टाळण्यासाठी प्रयत्न करणार, याचीच चर्चा सुरू आहे.

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="83085"]

आणखी संबंधित बातम्या

आरक्षित भूखंडावर ‘कृपां’चा साईप्रसाद इमला

कृपाशंकर सिंह यांची वांद्र्यातील साईप्रसाद बिल्डिंग वादाच्या भोव-यात सापडली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी आरक्षित भूखंडावर ही इमारत बांधण्यात आली आहे. एवढच नव्हे तर इमारत बांधताना सीआरझेड नियमही धाब्यावर बसवण्यात आलेत.
.
-------------------------------------------------

रत्नागिरी: बेकायदा जमिनीवर बांधकामाची ‘कृपा’

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंहांचे घोटाळ्यामागून घोटाळे उघड होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाडापेठ गावात कृपांच्या नातेवाईकांनी कशाप्रकारे जमीन लाटली होती. आता त्या लाटलेल्या जमीनवर बेकायदा बांधकाम झाल्याचं उघड झालं आहे.
.
-------------------------------------------------