मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील दोन घरांवर आणि ऑफिसवर छापा मारला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हा मारला छापा मारला आहे. दरम्यान, कृपाशंकर यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
ऑफिसमधील काही कागदपत्रं जाळण्यात आल्याचा आरोप होत होता. आज सकाळी बांद्रामधील साई प्रसाद आणि पार्ला येथील घर आणि ऑफिसवर टाकले छापे टाकले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने आपला मोर्चा वसईकडे वळवला आहे. वसईतील त्यांच्या जावयाच्या एका घरावर छापा मारला आहे. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलीस कृपाशंकर सिंह यांच्या घरांची झडती घेत आहेत. कागदपत्र लपविण्याचा प्रकार सुरू असल्याने हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. तसेच कृपाशंकर सिंह हे कुटुंबासह अज्ञातवासात आहेत. त्यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याने ते अज्ञातवासात गेले आहेत.