www.24taas.com, मुंबई
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज १७ हजार ४७८ अंशावर बंद झाला, सेन्सेक्समध्ये ७३ अंशाची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज ५ हजार ३१७ अंशावर बंद झाला. त्यात २२ अंशांची वाढ दिसून आली. आज सकाळी शेअर बाजार खुला होताना तुलनेन घट पहायला मिळाली, सकाळच्या सत्रात सातत्यानं घसरण पहायला मिळाली, मात्र दुपारच्या सत्रात बाजारात हळूहळू वाढ आणि नंतर पुन्हा घट पहायला मिळाली आणि शेवटी बाजार १७ हजार ४७८ वर स्थिरावला.
मार्च महिन्याच्या विक्रीचा मासिक डेटा प्रकाशित झाल्यानंतर अल्ट्रा टेक, अंबुजा,एसीसी या सिमेंट कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये घट तर जयप्रकाश असोशिएटसच्या स्टॉक्समध्ये वाढ दिसून आली. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदरात कपात करण्याचे रिझर्व बॅंकेनं सूचित केल्यानंतर संवदनशील रिएलिटी आणि बॅंक स्टॉक्समध्ये वाढ दिसून आली. ऑईल मार्केटींग कंपनीनं ३ % इंधन दरवाढ केल्यामुळे हवाई वाहतूक कंपन्यांचे स्टॉक्स घसरले होते. मलेशियातील एम बॅकेंकडून कोर बॅंकीग सेवा पुरवण्यासाठी टीसीएसची निवड झाल्यामुळे टीसीएसचे शेअर्स वाढलेले होते, तर इन्फोसिसचे भाव कमी झाले होते.
दागिन्यांच्या देशांतर्गत विक्रीसाठी सोनं थेट आयात करण्याची परवानगी दिल्याच्या वृत्तामुळे टायटनसारख्या ज्वेलरी बनवणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये वाढ दिसून आली. आज डीएलएफ, एनटीपीसी, टीसीएस, लार्सेन, महा एण्ड महा या कंपन्यांचे शेअर्स वधारलेत होते. तर बजाज एटो, हिंडाल्को, स्टर्लाईट, मारूती सुझुकी आणि रिलायन्स या कंपन्याचे शेअर्स घसरले आहेत.