मी बळीचा बकरा - छगन भुजबळ

मंत्रालयात लागलेल्या आगीबाबत मुख्यामंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून छगन भुजबळ यांना टीकेचं लक्ष्य केलं होतं. मात्र छगन भुजबळ यांनी झी 24 तासशी बोलताना सर्व आरोप फेटाळत कुणीतरी बळीचा बकरा लागतो असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय. तसंच मंत्र्यालयावर सामान्य प्रशासनाची हुकूमत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलंय.

Updated: Jun 24, 2012, 07:36 PM IST

www.24taas.com, मुंबई

मंत्रालयात लागलेल्या आगीबाबत मुख्यामंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून छगन भुजबळ यांना टीकेचं लक्ष्य केलं होतं. मात्र छगन भुजबळ यांनी झी 24 तासशी बोलताना सर्व आरोप फेटाळत कुणीतरी बळीचा बकरा लागतो असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय. तसंच मंत्र्यालयावर सामान्य प्रशासनाची हुकूमत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलंय.

मंत्रालयाचं काम उद्यापासून

मंत्रालयाचं काम उद्यापासून सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिलीय. आज भुजबळांनी मंत्रालयाची पाहणी केली..चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यांच्या स्वच्छतेचं काम सुरू असून तीन महिन्यांच्या आत केबिनचं नुतनीकरण होईल असही भुजबळांनी सांगितलं.

आज भुजबळांनी मंत्रलायाची पाहणी केली.  पहिले तीन मजले कामकाजासाठी तयार करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.त्यामुळे पहिल्या तीन मजल्यांवरून कामाकाज सुरू करायला काहीच हरकत नसल्याचं भुजबळांनी यावेळी सांगितलंय.

मंत्रालयाच्या आगीत दोन हजार संगणक जळून खाक झाल्याची माहिती यापूर्वीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तर मंत्रालयाच्या आगीत जळालेल्या कागदपत्रांच्या पुनर्निमाणासाठी सरकारने कसोशीने प्रयत्न सुरु केले आहेत. ज्या नागरिकांची कागदपत्र आगीत नष्ट झाली आहेत, त्यांच्यासाठी सरकारने प्रत्येक तहसिलदार कार्यालयात एक विशेष कक्ष स्थापन करण्याचं ठरवलं आहे.

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="126636"]