www.24taas.com, मुंबई
दक्षिण मुंबईतून घाटकोपरपर्यंत जलद जाता यावं यासाठी बांधण्यात येत असलेल्या ईस्टर्न फ्री वेचा एका काँक्रिटचा गर्डर वडाळ्यात कोसळून अपघात झाला. त्या खाली सापडून एक जण ठार झाला तर आठ जण जखमी झाले.
जखमींना उपचारासाठी केईएम आणि सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यात टँकर आणि काही गाड्याही या गर्डर खाली दबल्या गेल्या. अपघाताची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. अंधारामुळे मदतकार्यात अडथळे येऊ लागल्यानं जनरेटरच्या मदतीने प्रकाशाची सोय करण्यात आली होती.
मुंबईत वडाळ्यात ईस्टर्न फ्री वेचा काही भाग कोसळला आहे. वडाळ्याच्या शांतीनगर भागात ही घटना घडली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.