म्हाडाची ४,२७२ घरांसाठी पुन्हा लॉटरी

२ हजार ५९३ घरांसाठी लॉटरीची सोडत काढल्यानंतर आता पुढील वर्षी मुंबई शहरात घरे बांधण्याचा मानस म्हाडाचा आहे. म्हाडा ४,२७२ घरांसाठी पुन्हा लॉटरी काढणार आहे.

Updated: Jun 1, 2012, 08:38 AM IST

www.24taas.com, मुंबई

२ हजार ५९३ घरांसाठी लॉटरीची सोडत काढल्यानंतर आता पुढील वर्षी मुंबई शहरात घरे बांधण्याचा मानस म्हाडाचा आहे. म्हाडा ४,२७२ घरांसाठी पुन्हा लॉटरी काढणार आहे.

मुंबई आणि उपनगरांतील जमिनींच्या वाढत्या किमती आणि बांधकाम साहित्याचे वाढते दर लक्षात घेता भविष्यात म्हाडाच्या घरांच्या किमती चढय़ाच राहतील, अशी शक्यता वर्तवत ४ हजार २७२ घरांसाठी पुढल्या वर्षी लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा म्हाडा प्राधिकरणाने गुरूवारी केली.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या २ हजार ५९३ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. या वेळी म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई आणि मुंबई मंडळाचे प्रभारी मुख्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी हि माहीती मीडियाला दिली.  भारत बंदचा परिणाम  सोडतीवर दिसून आला. सोडत सभागृहात शुकशुकाट दिसून आला.