सतत तुटणारी नखे आणि दातांमधील झिणझिण्या; शरीरातील 'या' घटकाच्या कमकरतेची लक्षणे

शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. काय आहेत कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे?

Updated: Jan 21, 2025, 11:54 AM IST
सतत तुटणारी नखे आणि दातांमधील झिणझिण्या; शरीरातील 'या' घटकाच्या कमकरतेची लक्षणे title=

Calcium Deficiency Symptoms: शारीरिक स्वास्थ्यासाठी पोषकत्त्व ही खूप महत्त्वाची आहेत. या पोषकत्त्वांपैकी एका सुद्धा घटकाची कमतरता घातक आजाराला आमंत्रण देऊ शकते. आपल्या शरीरातील पोषकत्त्वांपैकी कॅल्शियमचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कॅल्शियमची कमतरता शरीरातील वेगवेगळ्या समस्यांना कारणीभूत ठरते. हाडांच्या निर्मितीसाठी आणि ती मजबूत होण्यासाठी कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या शरीरात 99 टक्के कॅल्शियम हे हाडांमध्ये आणि दातांमध्ये असते. तसेच, कॅल्शियम मेंदू आणि शरीराच्या इतर अवयव कार्यरत ठेवण्यासाठी खूप मदरशीर आहे. कॅल्शिममुळे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी सुद्धा मजत होते. त्यामुळे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेला 'हायपोकॅल्सीमिया' असे म्हणतात. या आजारामुळे हाडे कमकुवत होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. 

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना: जर तुम्हाला हाडे आणि स्नायूंमध्ये वारंवार वेदना जाणवत असतील, तर ही तुमच्या शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात. 

हाडे कमकुवत होणे: कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरातील हाडे कमकुवत होतात आणि त्यामुळे फ्रॅक्चरचा गंभीर धोका उद्भवू शकतो. 

सतत नखे तुटणे: सतत तुटणारी आणि कमजोर नखे ही सुद्धा कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत. 

दातांच्या समस्या: कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातांमध्ये सतत झिणझिण्या येतात आणि दात पिवळे पडतात. कॅल्शियम कमतरतेमुळे दात कमकुवत होऊन ते तुटण्याचीसुद्धा शक्यता असते. 

मानसिक अवस्थेत बदल: शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे तणाव, चिंता तसेच डिप्रेशन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

अनियमित हृदयाचे ठोके: कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदयाचे ठोके अनियमित होण्याची भिती निर्माण होऊ शकते. तसेच, शरीरात मुंग्या येणे हे सुद्धा कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. 

हे ही वाचा: लिव्हर खराब झाल्यामुळे त्वचा आणि नखांवर दिसतात 'ही' 4 लक्षणे; दुर्लक्ष करणं महागात पडेल

 

भरपूर प्रमाणात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश

शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी तुमच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. दुध आणि दुधापासून बनलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेला भरुन काढले जाऊ शकते. पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे आपल्या आहारात पालेभाज्या या कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत ठरु शकतात. तसेच, मासेसुद्धा कॅल्शियमचे चांगले स्त्रोत मानले गेले आहेत. त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने माश्यांचे सेवन हे अत्यंत फायदेशीर ठरते. संत्री, अंजीर आणि केळ्यांचे सेवन केल्याने कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यास मदत होते. शरीराला मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, असे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात खाल्ले पाहिजेत. 

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)