'या' खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार रोहित शर्मा...मुंबईचा संघ जाहीर

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल रणजी ट्रॉफी खेळताना दिसणार आहेत.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 21, 2025, 11:45 AM IST
'या' खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार रोहित शर्मा...मुंबईचा संघ जाहीर title=

Mumbai squad for Ranji Trophy:  अलीकडेच रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली असून. या संघात रोहित आणि यशस्वीचाही समावेश करण्यात आला आहे. शिवाय यामध्ये यशस्वी जैस्वालही आहे. मुंबई संघाची कमान अनुभवी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. अशाप्रकारे हिटमॅन आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली रणजी ट्रॉफी खेळणार आहे. मुंबई संघ 23 जानेवारीपासून जम्मू-काश्मीरविरुद्ध पुढील सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मुंबई संघात रोहित आणि यशस्वी यांची निवड करण्यात आली आहे.

अजून कोणत्या खेळाडूंचा मुंबई संघात समावेश करण्यात आला?

रोहित शर्माशिवाय श्रेयस अय्यरचाही मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित आणि यशस्वीसोबतच श्रेयस अय्यरचाही मुंबई संघात करण्यात आला आहे. या तिघांची निवड चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात झाली आहे. यामुळे तिघेही रणजी ट्रॉफी सामन्यात आपली तयारी मजबूत करतील. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे.

हे ही वाचा: रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची भेट कशी झाली? जाणून घ्या रिंकू सिंगची फिल्मी लव्हस्टोरी

 

तब्ब्ल 10 वर्षांनंतर 'ही' स्पर्धा खेळणार रोहित शर्मा

हिटमॅन रोहित शर्मा तब्ब्ल 10 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. २०१५ मध्ये रोहितने यूपीविरुद्ध  शेवटचा रणजी सामना खेळला होता. अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा रोहितने रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते.

हे ही वाचा: कशी दिसायची हुस्न की मल्लिका 'अनारकली'? सौंदर्यासाठी अकबराने तिला केले होते हॅरेममध्ये कैद

 

आहे 'या' खेळाडूंचाही समावेश 

रोहित, श्रेयस आणि यशस्वी यांच्याशिवाय मुंबईच्या टीममध्ये अष्टपैलू शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांनाही स्थान देण्यात आले आहे.  मात्र, या दोघांचीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात निवड झालेली नाही.

हे ही वाचा: Video : बांगलादेशी प्रेक्षकांकडून हिंदू क्रिकेटरचा अपमान, Live मॅचमध्ये जे घडलं ते पाहून संताप होईल

 

रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), तनुष कोटियन, शम्स मुलाणी, हिमांशू सिंग, शार्दुल थवा, शार्दुल सिंह. , सिल्वेस्टर डिसोझा, रॉयस्टन डायझ, कार्श कोठारी.