राष्ट्रवादीत ९ अपक्ष आमदार सामील

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

Updated: Sep 15, 2014, 04:20 PM IST
राष्ट्रवादीत ९ अपक्ष आमदार सामील title=

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे अपक्ष आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, तर नंदुरबार जिल्ह्यातील समाजवादी पार्टीचे नवापूरचे आमदार शरद गावित यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल राष्ट्रवादीत सामिल झाले आहेत.

कराड उत्तरचे अपक्ष आमदार बाळासाहेब पाटील, वाईचे आमदार  मकरंद पाटील, दौंडचे आमदार रमेश थोरात यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

विदर्भातील  वर्ध्याचे अपक्ष आमदार सुरेश देशमुख यांचा समावेश आहे.

मराठवाड्यातून लातूरमधील अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

काँग्रेस नेते नारायण राणे समर्थक राजन तेली, काका कुडाळकरही  हे देखिल राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या आमदारांची नावं आणि मतदारसंघ

खानदेश
साहेबराव पाटील अमळनेर
शरद गावित, नवापूर

विदर्भ
सुरेश देशमुख, वर्धा

मराठवाडा
बाबासाहेब पाटील, अहमदपूर

पश्चिम महाराष्ट्र
दिलीप सोपल, बार्शी
बाळासाहेब पाटील, उत्तर कराड
मकरंद पाटील, वाई
मानसिंग नाईक, शिराळा
रमेश थोरात, दौंड

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.