मुंबईत शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला

मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतरही महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. मंगळवारी सकाळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका अज्ञाताने शिवानी प्रमोद शिंदे (१३) या शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला केला. ती गंभीर जखमी झाली. तिला ५५ टाक्के पडले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 28, 2013, 08:46 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतरही महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. मंगळवारी सकाळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका अज्ञाताने शिवानी प्रमोद शिंदे (१३) या शाळकरी मुलीवर जीव घेणा हल्ला केला. ती गंभीर जखमी झाली. तिला ५५ टाक्के पडले आहेत.
शिवानी हिच्यावर प्राणघातक शस्त्राने वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळलली. तिला तातडीने रुग्णालयात हलविल्याने सुदैवाने तिचे प्राण बचावले. आता तिची प्रकृती स्थिर आहे.
धारावी मुकुंदनगरातील शिवसेनेचे गटप्रमुख प्रमोद शिंदे यांची मुलगी शिवानी ही विद्यार्थिनी शौचालयातून घराकडे परतली. घराच्या दरवाजाजवळच तिला अज्ञाताने अडविले आणि पत्ता विचारण्याचा बहाणा करत हल्ला केला. पप्पांना पत्ता विचारते असे सांगत शिवानी पाठमोरी होताच त्या हल्लेखोराने तिच्या पाठीवर मानेपासून कंबरेपर्यंत धारदार शस्त्राने वार केले.
काही कळायच्या आत हल्ला झाल्याने शिवानी घाबरली. शिवानी ओरडताच हल्लेखोर पळून गेला. रक्तबंबाळ झालेल्या शिवानीला शीव रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसैनिकही रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला तत्काळ जेरबंद करा अशी मागणी केली. आरोपीला पकडून आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिवसेना स्टाइलने शिक्षा करू, असा इशारा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच धारावीतील सोशल नगरात एका १० वर्षीय चिमुकलीवर तिच्या एड्सग्रस्त सख्ख्या काकाने बलात्कार केल्याची घृणास्पद घटना ताजी असतानाच आणखी एका मुलीवर झालेल्या हल्ल्याने धारावीकर हादरले आहेत. शिवानीवर हल्ला झाला तत्पूर्वी शिवानीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अनिता तांबे हिच्या घरात घुसून या हल्लेखोराने मोबाईल चोरला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.